Home latest News 19 वर्षांच्या दलित महिलेची गळा चिरून निर्दय हत्या.

19 वर्षांच्या दलित महिलेची गळा चिरून निर्दय हत्या.

156

19 वर्षांच्या दलित महिलेची गळा चिरून निर्दय हत्या.

हैद्राबाद :- एका 19 वर्षांच्या दलित महिलेची तिच्या प्रियकराने  कथितरीत्या निर्दय हत्या केल्याची घटना आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात मंगळवारी घडली. पीडिता, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धर्मावरम शाखेत काम करायची. ती सकाळी ऑफिसला जाण्यास निघाली मात्र संध्याकाळी परत आली नाही. तिच्या पालकांना तिचा फोन बंद लागला तेव्हा त्यांनी अनंतपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिचा मृतदेह धर्मावरम तालुक्यातील बंदंन्नापल्ली इथं बुधवारी सकाळी आढळून आला.

स्नेहलताच्या पालकांनी राजेश आणि त्याचा मित्र कार्तिक हे दोघं गुन्ह्यात दोषी असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की राजेश पूर्वीपासूनच स्नेहलताला प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याबाबत आग्रह करून छळायचा. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही दिली आहे.

पोलिसांच्या मते, राजेशने स्नेहलताला पावणेसात वाजता बळजबरीनं आपल्या दुचाकीवर बसवत बंदंन्नापल्ली इथल्या शेतावर नेलं. तिचा गळा चिरत खून केला. तिची ओळख लपवण्यासाठी त्यानं तिच्याकडे असलेलं बँक पेपर्स तिच्याच शरीरावर ठेवत जाळले. परिणामी तिचा मृतदेह अर्धवट जळाला. लैंगिक गुन्ह्याचा कुठला पुरावा सापडला नसल्याचे पोलीस म्हणाले. गुन्हा केल्यावर राजेश कथितरित्या घरी जात मित्र कार्तिकसोबत दारू पित बसला. पोलिसांनी केस दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.