Home latest News धारदार शस्त्राने केली पत्नीची हत्या

धारदार शस्त्राने केली पत्नीची हत्या

89

धारदार शस्त्राने केली पत्नीची हत्या

धारदार शस्त्राने केली पत्नीची हत्या

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

राजुरा : 26 मे
घरगुती वादातून पतीने धारदार शस्त्राने पत्नीची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवार, 26 मे रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील तुलाणा येथे घडली. तुळजाबाई सेलूरकर असे मृतक महिलेचे, तर अनिल सेलूरकर असे आरोपी पतीचे नाव आहे.
तुलाणा येथील अनिल सेलूरकर हा टेलरिंग कारागीर असून, त्याला दोन अपत्य आहे. सुखाचा संसार सुरू असतानाच त्याला दारूच व्यसन जडले. यातून बर्‍याचदा पती-पत्नीमध्ये वाद होत होता. सध्या तेंदूपत्ता हंगाम असल्याने पत्नी तुळजाबाई रविवारी सकाळीच गावातील काही महिलांसोबत तेंदुपाने आणण्यासाठी जंगलात गेली होती. इकडे पती अनिलच्या मनात वेगळाच बेत होता. पत्नी तेंदूपत्ता घेऊन परत येत असताना गावाजवळील रस्यावर अनिलने पाठीमागून तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप चार वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी तुळजाबाई सोबत असलेल्या गावातील एक महिलेलाही अनिलने मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ती धावत गावाजवळ तेंदुपत्ता संकलन करीत असलेल्या नागरिकांकडे गेली असता ते तिच्या मदतीला धावून आले. महिलेने घडलेली घटना नागरिकांना सांगितली. नागरिकांनी त्वरित विरुर पोलिसांना माहिती दिली. माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पती अनिल हत्या करून विरुर पोलिस ठाण्यात शरण आला. पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे
घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विरुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष वाकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे गायकवाड करीत आहे.