Home latest News मुरुड येथे खुलेआम गुटखा दारू मटका ऑनलाइन लॉटरी विक्री

मुरुड येथे खुलेआम गुटखा दारू मटका ऑनलाइन लॉटरी विक्री

351

मुरुड येथील बस स्थानक ग्रामीण रुग्णालय जनता विद्या मंदिर या ठिकाणी गुटखा दारू मटका ऑनलाइन लॉटरी मोठ्या प्रमाणात विक्री

गोरे दत्ता, लातूर जिल्हा प्रतिनिधी: आज रोजी मुरुड गाव शहराचं रूप घेत असले तरी या ठिकाणी बिगर प्रवाणा नसताना बरेच ०२ नंबर धंदे मुरुड या ठिकाणी अति मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याच्या घटना मुरुड मध्ये घडत आहेत याकडे ग्रह खात्याचे तसेच ग्रह खात्याच्या प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र मुरूड या ठिकाणी निर्माण झाले आहे.

त्याचे सविस्तर विस्तार असे की मुरुड हे आता गाव नसून या गावाचे रूपांतर मुरुड शहरांमध्ये झाले आहे कै सहकार महर्षी शिवाजीराव नाडे साहेब यांनी मुरुड येथे ना दारू ना मटका ना गुटखा अशी परंपरा मुरुडला दिली होती त्यामुळे मुरुडचे नावलौकिक पंचक्रोशीत गाजलेले होते यामध्ये मुरुडचं नाव शैक्षणिक आरोग्य मुरुड मध्ये असलेले मोठी बाजारपेठ मुरुड मध्ये असलेला जनावरांचा बाजार मुरुड मध्ये असलेल्या भाजीपाल्याचा बाजार मुरुड या ठिकाणी असलेले डा य ट कॉलेज मुरुड येथील सहकारी दूधगंगा संस्था मुरुड येथील जिल्हा परिषद पंचायत समिती कन्या शाळा विविध सोसायटी सहकारी सोसायटी संस्था शासकीय प्रशासकीय अ प्रशासकीय सर्व परिमंडळ यांचा अभ्यास करून मुरूड या नावाला नावलौकिक मिळाले होते परंतु सध्याच्या ०२ नंबर मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे या धंद्यावाल्यांसाठी मुरुड या ठिकाणी अगोदर लगाम घालून ठेवलेला होता परंतु याला कुठेतरी धक्का लागत असल्याची चर्चा मुरुड मध्ये असणारे व्यक्ती करत असल्याचे चित्र आहे.

Breaking News: चित्रपट सृष्टीने अजून एक महान अभिनेता गमावला

मुरुड मध्ये लातूर धाराशिव बीड या जिल्ह्याच्या मधोमध असणारे व 40 किलोमीटर अंतरामध्ये असणारे मुरुड हे शहर आहे या मुरुड शहरांमध्ये लातूर बार्शी हा राज्य महामार्ग केलेला आहे या राज्य महामार्गावर असलेले दारूचे मटक्याचे अड्डे ऑनलाइन लॉटरी हे मोठ्या प्रमाणात आहेत याचे कारण आजपर्यंत तरी सर्वसामान्य नागरिकांना समजले नाही किंवा लातूर येथील प्रशासनास या बेकायदेशीर चालणाऱ्या धंद्याबाबत स्थानिक प्रशासन कुठल्याही प्रकारची माहिती दिली किंवा नाही दिली हा प्रकार असल्याची खंत मुरुडच्या नागरिकांमध्ये आहे मुरुड या ठिकाणी मुरुड मधील पोलीस स्टेशन किंवा पोलीस यांना या सर्व प्रकारची माहिती आहे का??? जर का माहिती आहेच आणि माहिती असणार परंतु मग पोलीस प्रशासन हे मूग गिळून गप्प का असेही चर्चा होत आहे तसेच मुरुड मध्ये करकट्टा शिवारात गुंफावाडी शिवारात हॉस्पिटलच्या बाजूस विनापरवाना बार सुरू राजोरासपणे सुरू असल्याचे चित्र आहे हे चित्र पोलीस अधीक्षकांना बहुतेक माहीत नसणार कारण त्यांच्याच पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या नातेवाईकां चे हे बार असल्याची चर्चा आहे परंतु याची बातमी लावली त्यावरच पोलीस प्रशासन कारवाही करेल किंवा माहिती देणाऱ्या वरच कारवाई करेल अशी भीती असल्याकारणाने याकडे ग्रह खाते किंवा लातूर पोलीस अधीक्षक कार्यालय गांभीर्याने घेत नसल्याची माहिती आहे.

त्यानंतर ग्रामीण रुग्णालयासमोर ०२ ते ०३ देशी दारूच्या दुकानात राजोरासपणे खुलेआम मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याची माहिती आहे तसेच आमराई मध्ये शंभूराजे चौकाच्या पुढे या ठिकाणी सुद्धा विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याची माहिती चर्चा मुरुडमध्ये रंगलेली आहे या अनुषंगाने मुरुड येथील पोलीस खाते झोपेमध्ये तर नाही ना जर जागे असे तर ते झोपेचं सोंग का घेत आहेत अशी चर्चा मुरुडच्या नागरिकांमध्ये आहे परंतु आपल्यावर गुन्हा दाखल होईल आपल्यालाच माहिती देणाऱ्यावरच कारवाई सध्याच्या काळामध्ये होत असेल किंवा होत असेल तर अशा कायद्याच्या चौकटीत राहणाऱ्या पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टी माहिती आहेत का नाही ते माहितीसाठी कशाला द्यायच्या अशी कंद नागरिकांमध्ये आहे तसेच मुरुड या ठिकाणी दोन नंबर धंदे मुरुड मध्ये सुरू आहेत सध्या त्यांची मुरुड सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे या ठिकाणी ना पोलिस प्रशासन लक्ष देत नाही ईतर प्रशासनाचे पदाधिकारी याकडे का लक्ष देतील हा आहे एक मुद्दा आहे तसेच मुरुड या ठिकाणी मोठी ग्रामपंचायत आहे परंतु दिसून आंदळ आणि ऐकून बहिरं असं सोंग मुरुडच्या ग्रामपंचायतला घ्यावा लागत आहे हे सर्व दोन नंबर धंदे मुरुड ग्रामपंचायत च्या अंतर्गत येतात परंतु हे बंद करा असे आव्हान सुधा ग्रामपंचायत करीत नसल्याची माहिती नागरिकांमधून आहे.

भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत त्याचा फटका राजकीय पक्षाला बसू नये म्हणून या दारू मटका गुटखा ऑनलाईन लॉटरी या धंद्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे तसे बघायला गेले तर मुरुड हे गाव 50 ते 60 हजार लोकसंख्येच्या वर असून यामध्ये विनापरवाने दारू ऑनलाइन लॉटरी मटक्याचे दुकाने थाटा माटात मोजक्या प्रशासकीय कार्यालयासमोरच थाटलेली आहेत त्यामध्येच मागील काही दिवसापासून मुरुड या ठिकाणी गुटख्याचे मोठे मोठे छापे पडले होते या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात मूरूड मध्ये गुटखा सापडला होता त्यामुळे मुरुड मध्ये गुटख्याची कमतरता भासत होती परंतु पहिल्या काळात गुटखा विकणारे आता सदा आम्ही धंदा बंद केला आहे असे चर्चा प्रशासनापुढे नागरिकापुढे करत असल्याचे चित्र आहे परंतु मुरुड मध्ये जर गुटखा बंद आहे तर तो येतो कुठून व केव्हा हे मात्र एक गुपित आहे ते लवकरच उघड होईल परंतु सध्या मुरुड या ठिकाणी गुटखा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की मुरुड हे गाव गुटखामुक्त झाले होते परंतु सध्या गुटखा येतो कुठून व जातो कुठे याचा काही ठावठिकाणा लागत नाही परंतु घरोघरी जाऊन गल्लोगल्लीत जाऊन हा गुटखा मात्र मुरुड मध्ये मोठ्या प्रमाणात वाटप होत असल्याचे चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

Breaking News: अखेर आंबेडकर उतरले निवडणुकीच्या रिंगणात

आता विषय राहिला पोलीस प्रशासनाचा या सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहिती आहेत की नाही माहिती आहेत तर पोलीस प्रशासन यावर कारवाई का करत नाही जर माहिती नसेल तर मुरुड मध्ये दोन नंबर धंदे कुणाच्या परमिशन ने चालतात याचे उत्तर मात्र मुरुड मध्ये कुणाकडेच नाही त्यामुळे मुरुड या ठिकाणी दारूचे दुकाने मटक्याचे दुकाने व गुटखा हे मात्र मोटार सायकली वरून ऑर्डर मिळेल तसे पोहोच करणे हा प्रकार काय याकडे मात्र कुठल्याही राजकीय पक्षाचे लक्ष नसून पोलीस प्रशासनाचेही लक्ष या गोष्टीकडे नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महिला त्यामुळे त्रस्त झाले आहेत याकडे कोणी लक्ष देईल का अशी वेडी आशा ज्या महिलांना दारू मटका बुटका याची व्यसन त्यांच्या पतींना आहे त्यांचा त्रास त्याच महिला भगिनींना माहिती आहे त्या महिलांचा टाहो कुठल्या राजकीय व्यक्तींना नेत्यांना कार्यकर्त्यांना किंवा पोलीस प्रशासन नाही येणार का अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे तसेच लातूर बार्शी हायवेवर जे दोन नंबर धंदे सुरू आहेत त्यावर लगाम लागणार का बातम्या आल्यामुळे त्यांच्या क्रेडिट वाढत राहील का त्यामुळे कोणाला तरी फायदा होईल का अशी चर्चा मात्र मुरुडच्या महिला वर्गामध्ये होताना दिसत आहे

त्यामुळे या गोष्टीकडे मुरुड येथील प्रशासनाने जरी दुर्लक्ष केले असेल तरी महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा प्रशासन आहे महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र शासन हे प्रशासन आहे त्यामुळे आता या गोष्टीकडे गांभीर्याने बघून या अगोदर कित्येक वेळा तरी गुन्हे दाखल होऊ ही परंत तेच लोक दोन नंबर धंदे विनापरवाना दारू मटका गुटखा ऑनलाईन लॉटरी करीत नसतील ना अशी चर्चा होत आहे यावरील लक्ष घालून लातूर बार्शी मुरुड गुंफावाडी मुरुड लातूर करकटा हद्दीत हायवे वर होणारे शासकीय कार्यालयाच्या समोर होणारे शाळेच्या १०० ते २०० मीटर वर होणारे ०२ नंबर धंदे केव्हा बंद होतील हे मुरुडच्या ग्रामपंचायतला पोलीस प्रशासनालाच माहिती असेल अशी मुरुड मधील महिला व नागरिक हे अपेक्षा चर्चा मात्र मुरुडच्या गल्ली ते लातूर लातूर ते मुंबई पर्यंत होत आहे हे मात्र नक्की त्यामुळे आता हे धंदे असेच राजोरासपणे वाढत राहणार का त्यावर बंदोबस्त होणार हे मात्र बघणे आता गरजेचे ठरणार आहे किंवा माहिती देणारे बातमी देणारे यांच्यावरच गुन्हे दाखल होणार यावर मात्र शंका कुशंका निर्माण होण्याचे चित्र आहेत हेही तेवढेच लक्षात घेणे गरजेचे आहे.