वैगनरच्या विद्रोहामुळे पुतिनचे टेंशन वाढले

रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.9921690779
गेल्या 17 महिन्यांपासून युक्रेनशी युद्ध करणाऱ्या रशियाला दिनांक 24 जून रोज शनिवारला मोठा धक्का बसला व गेली 23 वर्षे रशियावर अनभिषिक्त सत्ता गाजवणारे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात येवगेनी प्रीगोझिन यांच्या नेतृत्वातील खाजगी सैन्यानी शनिवारी बंडाळी केली.त्यामुळे पुतिनचा तख्तापलट होण्याची दाट शक्यता आहे.रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे.यात दोन्ही देशांची मानवी व वित्तीय हाणी मोठ्या प्रमाणात झाली व होत आहे.रशिया आपल्या संपूर्ण ताकदिनीशी युक्रेन सोबत लढुन त्याला नमविचा प्रयत्न सुरू आहे.परंतु अचानक पुतिनच्या विश्वासातील वैगनर ग्रृपने पुतिनच्या विरोधात विद्रोह पुकारल्याने पुतिनचे डबल टेन्शन वाढले आहे.
युक्रेन युद्धामध्ये वैगनर हे खाजगी लष्कर रशियाच्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते.परंतु आता युक्रेनमधुन वैगनरने आपले सैन्य माघारी नेल्याचे सांगितले जाते.आम्ही लष्करी बंड केलेले नसून न्याय मिळविण्यासाठी लढत आहोत.असे वैगनर ग्रृपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी म्हटले आहे.वैगनर ग्रृप ही पुतिनची खाजगी अत्यंत विश्वासू खाजगी सेना होती.परंतु अचानक वैगनरने पुतिनच्या विरोधात दंड थोपटले आहेत.वैगनरने पुतिनच्या विरोधात दंड थोपटल्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमील झेलेन्स्की यांचे होसले बुलंद झाल्याचे दिसून येते आणि नाटो वेट ॲन्ड वॉचच्या भुमिकेत आहे.पुतिनने ज्या सापाला दुध पाजले तोच साप पुतिनला डंक मारण्याच्या तयारीत आहे व याचा फायदा नाटो, युक्रेन व अमेरिका घेवू शकते.त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे टेन्शन वाढले आहेत.त्यामुळे रशियाला युक्रेनला निपटण्यापेक्षा वैगनरला काबुत आणने अत्यंत गरजेचे आहे.अन्यथा ब्लादिमीर पुतिनचा तख्तापलट होवू शकतो.
वैगनर ग्रृपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी दावा केला आहे की रोस्तोव्ह सेना मुख्यालयावर कब्जा केल्याचा दावा केला आहे.पुतिन यांच्या हेकेखोरपणामुळे रशिया-युक्रेन युद्ध वाढत आहे.अशा परिस्थितीत वैगनरने रशियाची साथ सोडली तर रशियाला मोठे नुकसान सुध्दा होवू शकते.त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी बंडखोर वैगनर सैन्यावर कडक कारवाई सुरू केली आहे.परंतु रशियातील वैगनर या खाजगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दोन दशकांहुन अधिक काळ असलेल्या सत्तेला 24 जून रोजी आव्हान दिले होते.परंतु नाट्यमय घडामोडी नंतर अचानक पुतिन-प्रिगोझिन यांच्यात करार झाल्यानंतर प्रीगोझिनचे बंड थंड झाले.परंतु या बंडाची चिंगारी केव्हाही उडू शकते याला नाकारता येत नाही.
वैगनरची बंडखोरी व युक्रेनला मिळत असलेली नाटोची सहाय्यता पहाता आतातरी रशियाने युद्ध रोखायला हवे व चर्चेच्या माध्यमातून युक्रेन-रशियाच्या समस्या सोडवायला पाहिजे.यातच रशियाचा मोठेपणा आहे.








