Home E-Paper पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना करण्यात आले सन्मानित 

पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना करण्यात आले सन्मानित 

183

कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक देऊन केले सन्मानित 

संजय कदम

पनवेल :पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालय नवीमुंबई यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे .

      नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे , पोहवा माधव शेवाळे , मपोशी साधना पवार , पोना सम्राट डाकी , रवींद्र पारधी आदीनी आता पर्यंत केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.