*नोडल अधिकारी असवले यांची बाधित नागरिकांशी चर्चा*

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
सातारा : – अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलन व महापूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना सर्व प्रकारची मदत पोहोचविणे तसेच तात्पुरत्या निवासाची साये करणे आणि सार्वजनिक मालमत्तेच झालेले नुकसान तात्काळ दुरुस्त करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पाटण तालुक्यासाठी नोडल अधिकारी म्हणून संजय असवले, उपजिल्हाधिकारी, भूसंपादक क्र. 21, सातारा यांचा नेमणूक केली आहे.
पाटण तालुक्यातील मौजे ढोकावळे येथील पुरग्रस्त नागरिकांना चाफेर ता. पाटण येथील शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आले. आज श्री. असवले यांनी तेथील नागरिकांची विचारपूस केली.








