Home latest News अंबाजोगाईत लोक विकास महाआघाडीच्या ‘कपबशी’ला दररोज मिळतोय युवा वर्गाचा पाठिंबा…

अंबाजोगाईत लोक विकास महाआघाडीच्या ‘कपबशी’ला दररोज मिळतोय युवा वर्गाचा पाठिंबा…

67

राजकिशोर मोदींसह सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रिजवान लाला पठाण यांच्या समर्थकांचा पाठिंबा..

अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई शहरातील युवक वर्ग राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने एकञित होवू लागला आहे. अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानाची तारीख जस-जशी जवळ येऊ लागली आहे. तस तशी लोक विकास महाआघाडीची ताकद वाढत आहे. ‘विश्वास जुना, कपबशी पुन्हा’ चा नारा शहरातील प्रत्येकाच्या तोंडी दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रात्री शहरातील मंगळवार पेठ भागात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते रिजवान लाला पठाण यांनी त्यांच्या समर्थकांसह लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या युवा मतदारांमुळे राजकिशोर मोदी व प्रभाग क्रमांक १, ९ आणि १० मधील नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे. तर लोक विकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नवा उत्साह संचारला आहे. एकूण काय तर लोक विकास महाआघाडीला मिळणारा अंबाजोगाईकरांचा वाढता पाठिंबा पाहता विरोधक हतबल झाले आहेत. अंबाजोगाईत लोक विकास महाआघाडीच्या ‘कपबशी’चा बोलबाला दिसून येत आहे.

नगरपरिषद निवडणूकीत यावेळेस ही सर्व नवतरूणाईने एकवटून अंबाजोगाई नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी तसेच त्यांच्या सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आणण्यासाठीचा विडा उचलला आहे. अंबाजोगाई शहरात युवा नेतृत्व संकेत राजकिशोर मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ देण्यासाठी अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ भागातील सामाजिक कार्यकर्ते रिजवान लाला पठाण यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या या निर्णयाचा मान राखत महाआघाडीत त्यांचे पापा मोदी, सय्यद ताहेर अब्दुल गफ्फार, अशोक मोदी, शहराध्यक्ष शेख मुख्तार, उपाध्यक्ष रशीदभाई, जावेद भाई यांनी सहर्ष स्वागत केले. यावेळी बोलताना पापा मोदी यांनी सांगितले की, नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार पेठ येथील समाजसेवक रिजवान लाला पठाण यांनी त्यांच्या असंख्य सहकार्यासह लोकविकास महाआघाडीला पाठिंबा जाहीर केला.

लोकविकासाच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या दिशेवरील विश्वासातून दिलेला हा पाठिंबा आमच्या वाटचालीत महत्त्वाची उर्जा देणारा आहे. रिजवान लाला पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहकार्याचा हात आमच्यासाठी एकत्रितपणे विकासाची दिशा अधिक बळकट करणारा आहे. नव्या ऊर्जेसह आणि सकारात्मक भावनेने पक्षकार्याची वाटचाल सुरू करणाऱ्या या सर्वांना पुढील राजकीय प्रवासासाठी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शहराच्या विविध भागातील असंख्य तरूण आज बिनशर्तपणे संकेत मोदी तसेच राजकिशोर मोदी यांच्या समर्थनार्थ उभा राहत आहेत. या तरूणांचा जोश व उत्साह पाहून पुन्हा एकदा मोदी यांच्या हाती शहराच्या विकासाची धुरा देण्याची जनभावना पुन्हा जोमाने उफाळून येऊ लागली आहे.

राजकिशोर मोदी यांनी मागील ३० ते ३५ वर्षांपासून अंबाजोगाई शहरासाठी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रेरित होऊन आजचा तरूण वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प करीत आहेत. मोदी यांनी शहरात विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व परिसरातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षित केले आहेत. त्याचबरोबर बॅंक, पतसंस्था, मल्टिस्टेट यांच्या माध्यमातून देखील शेकडो तरूण बेरोजगारांना आर्थिक सहाय्य करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सक्षमपणे उभा केले आहे. बाल- झुंबडच्या माध्यमातून शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना एक हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळेच राजकिशोर मोदी हे नांव अंबाजोगाई शहरातील लहानापासून ते वयोवृद्ध नागरिकांच्या मना मनामध्ये घर करून आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांचा मतदानरूपी आशीर्वाद हा राजकिशोर मोदी यांना व त्यांच्या विविध प्रभागातील सर्वच नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना व संपूर्ण सहकार्यांना या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हमखासपणे मिळेल असे चित्र दिसून येत आहे. शहरातील तरूणांचा जोश व उत्साह पाहून पुन्हा एकदा मोदी यांच्या हाती शहराच्या विकासाची धुरा देण्याची जनभावना जोमाने उफाळून येऊ लागली आहे