Home latest News लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार अहमदनगर जिल्ह्यातील घटना.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार अहमदनगर जिल्ह्यातील घटना.

87

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार अहमदनगर जिल्ह्यातील घटना.

अहमदनगर:- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन वेगवेगळ्या लॉज वर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर असे की सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे की वाडेगव्हाण येथील एका तरुणाने मला लग्नाचे आमिष दाखवून 20 जुलै ते 15 सप्टेंबर या कालावधील देवदैठण तालुका श्रीगोंदा येथील स्वप्नील व शरद वाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथिल एका लॉजवर घेऊन माझ्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

याबाबत कोणास काही सांगितले तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही तुझ्या मुलांना सांभाळणार नाही व तुझी समाजात बदनामी करीन असा दम देत राहायचा असे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी महिलेने तिच्या सासरची मंडळी भाया, दीर, जाव यांना सांगून शनिवारी दिनांक 28 रोजी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली सुपा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माहितीवरून त्या तरुणाविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक माहिती पोलीस घेत आहेत. सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले व सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.