मुकेश पांडे व अथर्व सुखदेवे यांना वेस्ट झोन गॉपलिंग चॅम्पियनशीप सिल्वर मेडल.
✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- स्थनिक बागला चौक येथील पैंथर मल्टी स्पोर्ट्स अकाडेमी व स्व.पु. बागला व्यायाम शाळेचे मल्ल श्री.मुकेश भीमसेन पांडे व अथर्व सुभाष सुखदेवे यांनी नाशिक इथे झालेल्या निवड चाचणी मध्ये मुकेश पांडे यांनी सुवर्ण पदक घेऊन महाराष्ट्र संघात ५८ किलो वजन गटात आपले स्थान निश्चित केले, तसेच अथर्व सुखदेवे निवड चाचणी मध्ये जुनिअर ५२ किलो वजन गटात द्वितीय स्थान पटकावीत आपले महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले.
दि. ४ ते ६ एप्रिल २०२१ ला गोवा येथे होणाऱ्या येस्ट झोन ग्रॅपलिंग चॅम्पियनशीप मध्ये मुकेश भीमसेन पांडे ५८ कि.ग्रा. सिनिअर व अथर्व सुखदेवे ५२ की.ग्रा. जुनिअर (अंडर १६) या दोन्ही ग्रुप मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधल्व करणार..
दोन्ही खेळाळू आपल्या यशाचे श्रेय आई- वडील आणि बागला कान्व्हेंट चे संस्थापक श्री. रमेशचंद्रजी बागला व जिल्हा ग्रॅपलिंग संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य श्री. उमेश ज. पंधरे यांना दिले गोवा इथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांचे सहयोगी उपाध्यक्ष श्री. भूषण देशमुख, सहसचिव श्री. शैलेश बागडे, कोषाध्यक्ष श्रीमती. नम्रता पित्तुलवार प्रवीण गीरोले, रामगोपाल पांडे, सुमित शुक्ला, संजय थोडगे, अनिल ठाकूर, शंकर कांबळे आदि खेळाडूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.