मुलीवर बलात्कार करणाऱ्यां नराधमाचा मुलीचा बापाने घेतला बदला, एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या.
क्राईम रिपोर्टर
आंध्र प्रदेश:- विशाखापट्टणम जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांची निर्दयपणे हत्या केली असल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टणम जिल्हात येणा-या जट्टादा गावात ही घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपीने स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दीलेल्या माहितीनुसर, माघील अनेक दिवसा पासून दोन कुटुंबात जुने वैर आहे आणि मृतांच्या कुटुंबातील सदस्याने खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही घटना समजताच संतापलेलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीच्या बलात्काराचा बदला घेण्याचे ठरवले. रागाच्या भरात 6 लोकांची हत्या करण्याचे धक्कादायक कृत्य केले.
सध्या बलात्काराचा नराधम आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे आणि त्याच व्यक्तीने एका कुटुंबातील सहा सदस्यांची हत्या कशी केली याचा गंभीरपणे शोध घेत आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशत आहे. त्यांना माहिती मिळताच घटनास्थळी जमाव जमला.
आता या भयानक घटनेपासून संपूर्ण गावात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात द घेतले असून त्याच्याकडून चौकशी केली जात आहे. हत्येमध्ये वापरलेले धारदार धारदार शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे.