बुलढाण्यात 25 वर्षीय महिला बस कंडक्टरच्या देहाला चटके मग गळा चिरून निर्घृण हत्या.
क्राईम रिपोर्टर
बुलडाणा,दि.16 एप्रिल:- बुलडाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील 25 वर्षीय महिला बस कंडक्टर मृतदेह माळरानावर अत्यंत वीदारक अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे असं हत्या करण्यात आलेल्या महिलाबस कंडक्टर नाव आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या अंत्री खेडेकर येथील माधुरी मोरे या बुलडाणा राज्य परिवहन महामंडळ आगारात बस कंडक्टर म्हणून नोकरी करत होत्या. 14 एप्रिलला वडिलांना त्यांनी सांगितलं होतं की, त्या साखळी येथे आपल्या मावशीच्या घरी आहेत. त्यानंतर आपलं काम संपवून आठवडी सुट्टीला त्या अंत्री खेडेकरला येणार होत्या, पण आज चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकरच्या माळरानावर त्यांचा मृतदेह आढळला.
माधुरी मोरे यांच्या मृतदेहाला चटके देण्यात आले होते. तसेच त्यांचा गळा चिरून मृतदेह माळरानात फेकून देण्यात आला होता. सकाळी फिरायला गेलेल्या लोकांना हा मृतदेह आढळल्याने त्यांनी लगेचच संबंधित घटनेची पोलिसांना माहिती दिली. माधुरी मोरे या घटस्फोटित असल्याचंही बोललं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील महिलेच्या अंगावर चटक्याचे वर्ण आहेत, तसेच गळा ही चिरण्यात आला असून हातापायावरही चाकूने वार केल्याचं दिसून येत आहे. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ अंढेरा गाव पोलिस आणि फोरेंसिक टीम घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. आणि त्याचा प्राथमिक तपास करून मृतदेह चिखली येथील शासकीय रुग्णालयात पाठविन्यात आला आहे. तसेच सदरील घटना ती प्राथमिकरित्या हत्या असल्याचं दिसून येत असल्याने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.