महिला डॉक्टरची आत्महत्या, अडीच वर्षांचा चिमुकला आई वीना पोरका.
महिला डॉक्टरची आत्महत्या, अडीच वर्षांचा चिमुकला आई वीना पोरका.

महिला डॉक्टरची आत्महत्या, अडीच वर्षांचा चिमुकला आई वीना पोरका.

महिला डॉक्टरची आत्महत्या, अडीच वर्षांचा चिमुकला आई वीना पोरका.
महिला डॉक्टरची आत्महत्या, अडीच वर्षांचा चिमुकला आई वीना पोरका.

✒️औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी ✒️
औरंगाबाद,दि.21 एप्रिल:- औरंगाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिला डॉक्टरांनी गळाफास घेउन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद येथील प्रसिद्ध घाटी येथील दंत रुग्णालयात डॉक्टर असलेल्या महीला डॉक्टरनी मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. प्रियांका प्रमोद क्षीरसागर 27, रा. कांचनवाडी असे त्यांचे नाव आहे.

घाटीच्या दंत रुग्णालयातील डॉ. प्रियांका क्षीरसागर यांचे डॉ. पती प्रमोद हे दोघे पण घाटी रुग्णालयात कार्यरत आहेत. या दोघांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते कांचनवाडी येथील ग्रँण्ड कल्याण सोसायटीमध्ये राहात होते. डॉक्टर दाम्पत सुखाने आपल्या अडीच वर्षांचा चिमुकल्या बरोबर रहात होते. मंगळवारी सकाळी डॉक्टर दांपत्यामध्ये घरातील किरकोळ कारणावरुन वाद झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याच कारणातून डॉ. प्रियांका यांनी दुपारी बाराच्या सुमारास बेडरुममधील फॅनला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार समोर आल्यावर डॉ. प्रमोद यांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. पोलिस दाखल होईपर्यंत प्रियांका यांना बेशुध्द अवस्थेत फासावरुन खाली उतरविण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी प्रियांका यांना तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी सुसाईड नोट सापडली
पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तेव्हा तेथे सुसाईड नोट आढळून आली. या नोटमध्ये ”माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये” असे लिहून त्याखाली स्वाक्षरी केली आहे. ही नोट पोलिसांनी जप्त केली. मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. याविषयी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस तपास करीत आहेत. या घटनेविषयी त्यांच्या मृताच्या नातेवाईकांनी तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here