घरीच साजरा करा, प्रभूरामाचा जन्मोत्सव, उत्सवाचा फोटो अपलोड करा: महानगर भाजपाचे आवाहन.
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना चंद्रपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४अंकी झाला आहे.अश्यात नागरिकांनी विषेश काळजी घेत प्रभूरामाचा जन्मोत्सव घरीच साजरा केला पाहिजे.घरी साजरा करण्यात आलेल्या उत्सवाचे फोटो किंवा सेल्फी विथ श्री राम” करून त्याचे फोटो किंवा व्हीडिओ क्लिपस् फेसबुक(सोशल मीडिया)वर अपलोड करा,असे आवाहन महानगर भाजपा महानगर जिल्हाअध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.
दरवर्षी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.येथील काळा राम मंदिरात दुपारी 12 वाजता रामजन्म उत्सव झाल्यावर भव्य शोभायात्रा देखील काढली जाते.परंतु या परंपरेला 2019 पासून कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.यंदा कोरोनाची स्थिती पूर्वीपेक्षाही बिकट आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराच्या बाहेर न निघता घरीच रामजन्म उत्सव करून,कोरोना संपण्यासाठी प्रभू श्री राम चरणी प्रार्थना करावी,असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आले.या उत्सवासाठी माजी वित्त मंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,सर्व महामंत्री,सचिव,उपाध्यक्ष व इतर पदाधिकारींनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.