12 तास बेडसाठी नातेवाइकांच्या रुग्णालयात विनंत्या, बेड मिळाला नाही, झाडाखाली पत्नीसमोरचं कोरोना बाधिताने सोडला जीव.

✒ त्रिशा राऊत ✒
चिमुर तालुका प्रतीनिधी
चंद्रपूर, 22 एप्रिल:-
चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सोबतच सुविधांचा सुद्धा अभाव आहे. बेड अभावी मागील चार दिवसापासून रोज मृत्यू होत आहे. अशातच एक हृदयद्रावक घटना आज घडली, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातून एक वृद्ध जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील कोविड रुग्णालयमध्ये सकाळी आठ वाजता दाखल झाले. परंतू बेड मिळाला नाही. 12 तास बेडसाठी नातेवाइकांनी रुग्णालयात विनंत्या केल्या, परंतू कोणीही त्यांची हाक ऐकली नाही. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क साधला सामाजिक कार्यकर्त्यांनी बेडसाठी प्रयत्न केले. शेवटी बेड मिळाला परंतू तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्या वृद्ध रुग्णाने पत्नी समोर प्राण सोडले. बेडसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि उपचारा आधीच रुग्णाचा मृत्यू अशा घटना वाढत चालल्या आहेत.

शहरातील मुख्य शासकीय कोविड रुग्णालय परिसरातील या घटनेने आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी यंत्रणेला जागे केल्यावर बाधिताला बेड दिला गेला. मात्र उपचार सुरू करण्याआधीच बाधिताने प्राण सोडले. केवळ उपचारात 12 तास विलंबामुळे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील बापू कापकर या बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना उपचाराची असहाय स्थिती उघड झाली आहे. अन्य कुणावर अशी वेळ आणू नका अशी कळकळीची विनंती मयताच्या नातेवाईकांनी सरकारला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here