मुंबई भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट मिळणार नाही By Bhaguram Sawant - March 30, 2018 71 Share WhatsApp नवी दिल्ली – ज्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल असेल अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ज्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी तपास सुरू असेल किंवा त्यात तो दोषी आढळला तर अशा अधिकाऱ्यांना पासपोर्ट देण्यात येणार नाही. सरकारने पासपोर्टसाठी सुधारित अधिसूचना जारी केल्या आहेत. यात भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट न देण्याची तरतूद करण्यात आली आहे. भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची प्राथमिक यादी पासपोर्ट कार्यालयाकडे असायला हवी. या अधिकाऱ्यांच्या पासपोर्टला मंजुरी द्यायची किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय पासपोर्ट कार्यालय घेईल, असंही या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.