आय.पी.एल क्रिकेट वर जुगार खेळणाऱ्या वर रामनगर पोलीसांचा छापा.
आय.पी.एल क्रिकेट वर जुगार खेळणाऱ्या वर रामनगर पोलीसांचा छापा.

आय.पी.एल क्रिकेट वर जुगार खेळणाऱ्या वर रामनगर पोलीसांचा छापा.

21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 2 आरोपींना अटक

आय.पी.एल क्रिकेट वर जुगार खेळणाऱ्या वर रामनगर पोलीसांचा छापा.
आय.पी.एल क्रिकेट वर जुगार खेळणाऱ्या वर रामनगर पोलीसांचा छापा.

मनोज खोब्रागडे ✒
पुर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतीनिधी
चंद्रपूर:- सध्या आय.पी.एल क्रिकेट सुरू आहे. त्यामूळे चंद्रपुर जिल्हातील क्रिकेटवर सट्टा घेणारे बुक्की आणि सटोरी साठी सुगीचे दिवस आले. असाच एका क्रिकेट बुक्कीचा चंद्रपुर पोलीसांनी छापा टाकुन पर्दाफास केला आहे.

रामनगर पोलीस निरीक्षक रोशन आर यादव यांचे मार्गदर्शनात सपोनि मलौक, डिबी पथक पो.स्टे. ला हजर असताना गुप्त बातमीदाराचे माहीती वरून ऐकर मनवर अली व आसिफ हबीब पढान दोन्ही ग. पन्नीर वार्ड सद्रपुर आपले घरासमोर सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन मोबाईलवर पैश्यानी बाजी लावून जुगार खेळ खेळीत आहे. अशी माहिती प्राप्त होताच नमूद आरोपीतावर रेड करून आरोपी बुक्कीना अटक केली.

रामनगर पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून पन्नी मोहल्ला, जलनगर वार्ड, चंद्रपुर येथे छापा टाकण्यात आला. त्यात पैकर मनवर अली वय 41 वर्ष, आसिफ हबीब पठान वय 29 वर्ष दोन्ही रा. पन्नी मोहल्ला जलनगर वार्ड, चंद्रपुर यांना अटक केल आहे. यांच्या कडून एक जुना वापरता विवो कंपनीचा मॉडल कमांक 1920 मोबाईल किंमत 9 हजार रुपये, एक जुना वापरता विवो कंपनीचा मॉडल क्रमांक120 चा मोबाईल किमत 12 हजार रूपये असा एकूण 21 हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. कलम 12 (अ) मजुका अंतरगर्त कार्यवाही करण्यात आली

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी नांदेडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक रोशन यादव, सपोनि मलीक, गजानन डोईफोडे, प्रशांत शेदरे, संजय चौधरी, पेतरस सिडाम, सतिष अवथरे, लालु यादव, संदिप कावडी, भावना रामटेके यानी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here