औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात 7 जून रोजी लोकशाही दिन.

52

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात 7 जून रोजी लोकशाही दिन.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात 7 जून रोजी लोकशाही दिन.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात 7 जून रोजी लोकशाही दिन.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
औरंगाबाद, दिनांक 3(जिमाका) :- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतो. जून महिन्याचा लोकशाही दिन 7 जून रोजी दु. 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविले आहे.

लोकशाही दिनामध्ये पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक (ग्रामीण), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, परिवहन महामंडळ, जिल्हा उपनिबंधक, कृषी विभाग, पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित राहतील. या विभागातील तक्रारी संबंधांत निवेदने, अडीअडचणीबाबतचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन प्रतीत विहित नमुन्यात सादर करावा. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्जदारांनी तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करुन त्याची पोचपावती जिल्हास्तरीय लोकशाही दिनात सादर करण्यात येणाऱ्या अर्जासोबत जोडावी. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्वी, अपिल्स, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबींचा यात समावेश नसावा. त्रयस्थांमार्फत अर्ज पाठवू नये. तक्रारदारांनी, निवेदनकर्त्यांनी स्वत: सकाळी 11 ते दु. 1 वाजेपर्यंत तक्रार, निवेदन दाखल करावे व लोकशाही दिनात उपस्थित रहावे, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.