*नांदेड जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित तर 173 कोरोना बाधित झाले बरे*
🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961
नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 46 अहवालापैकी 150 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 66 तर अँटिजेन तपासणीद्वारे 84 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 136 एवढी झाली असून यातील 86 हजार 973 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 768 रुग्ण उपचार घेत असून 25 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 890 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 30, हदगाव 2, मुदखेड 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 12, किनवट 3, उमरी 2, भोकर 2, लोहा 2, हिंगोली 3, देगलूर 2, माहूर 3, परभणी 2 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 35, देगलूर 3, किनवट 4, उमरी 1, नांदेड ग्रामीण 16, हदगाव 4, माहूर 1, परभणी 2, अर्धापूर 1, हिमायतनगर 2, मुदखेड 5, हिंगोली 2, बिलोली 2, कंधार 2, नायगाव 2, यवतमाळ 1 असे एकूण 150 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 173 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 4, मुखेड कोविड रुग्णालय 4, लोहा कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, किनवट कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 25, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 130 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 768 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 36, माहूर कोविड केअर सेंटर 4, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 26, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 3, लोहा कोविड रुग्णालय 5, भोकर कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 385, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 224, खाजगी रुग्णालय 56 व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 120 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 52 हजार 986
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 51 हजार 609
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 136
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 86 हजार 973
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 890
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.49 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-169
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 768
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-25