महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमांतर्गत मंगळवारी कार्यशाळा.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
नांदेड, दि.5 (जिमाका):- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत अधिनियमाची तोंड ओळख होणे व या अंतर्गत तक्रार समितीचे गठण, कार्यकारी मंडळाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या आदी माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची कार्यशाळा मंगळवार 8 जून 2021 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुपारी 3 ते सायं 6 या वेळेत करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणास सर्व विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावे व त्यांच्या अधिकार क्षेत्रातील कार्यलय प्रमुखांना उपस्थित राहण्याची सूचना विभाग प्रमुखांनी त्यांच्या स्तरावरुन निर्गमीत कराव्यात. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या आस्थापनेत 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असेल त्यांनी प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here