कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा वैदधने केला विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेडया.

कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा वैदधने केला विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेडया.
कावीळ झाल्याने उपचारासाठी आलेल्या महिलेचा वैदधने केला विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेडया.

✒अभिजीत सकपाळ✒
भिवंडी, ठाणे प्रतिनिधी
9960096076
मुंबई,दि.12 जुलै:- मुंबईच्या मीरा रोड परीसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महीलेला कावीळ झाल्याने ती एका वैदधा कडे उपचार घ्यायला आली होती. उपचार करणा-या वैदधाने या महिलेचा विनयभंग केल्याने संतापलेल्या महिलेच्या पतीने वैदधाला चांगलाच चोप दिला. पुन्हा असे करणार नाही असा गयावया करणाऱ्या वैदधा विरोधात भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार पीडित महिला ही 22 वर्षाची असून आपल्या पतीसह राहते. तिची प्रकृती ठीक नसल्याने कावीळची लागण झाल्याचा संशय होता. त्या अनुषंगाने 8 जुलै रोजी ती भाईंदर पूर्व फाटक मार्गावरील अन्वर इमारतीत कावीळवर उपचार करणाऱ्या असलम शेख या वैदूकडे गेली होती. चाचणी नंतर तिला कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले.

10 जुलै रोजी सायंकाळी ती उपचारासाठी असलम शेख कडे गेली त्यावेळी शेख याने तिच्याशी बळजबरी अश्लील चाळे सुरू केले. माझ्याशी मैत्री करशील का असतो विचारू लागला. त्यावर पीडित महिलेने त्याला धक्का देऊन तेथून स्वतःची सुटका करून घेतली व घडला प्रकार पतीला सांगितला. उपचाराच्या आड विनयभंग करणाऱ्या वैदू ला पीडितेच्या संतप्त पतीने त्याला चोप दिला. पीडितेच्या विनयभंग केल्याच्या फिर्यादी नंतर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वैदू शेख केला बेड्या ठोकल्या आहेत.