फिन्ले मिल’सह अन्य गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत* *कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूयांचे* *मुख्यमंत्र्यांना निवेदन* *कामगारांच्या प्रश्नांबाबत* *मुख्यमंत्र्यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा*

54

*‘फिन्ले मिल’सह अन्य गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत*
*कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूयांचे* *मुख्यमंत्र्यांना निवेदन*
*कामगारांच्या प्रश्नांबाबत* *मुख्यमंत्र्यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा*

फिन्ले मिल’सह अन्य गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत* *कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूयांचे* *मुख्यमंत्र्यांना निवेदन* *कामगारांच्या प्रश्नांबाबत* *मुख्यमंत्र्यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा*
फिन्ले मिल’सह अन्य गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत*
*कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूयांचे* *मुख्यमंत्र्यांना निवेदन*
*कामगारांच्या प्रश्नांबाबत* *मुख्यमंत्र्यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा*

✍️मनोज खोब्रागडे✍️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961

अमरावती : – अचलपूर येथील फिन्ले मिलसह राज्यातील अन्य मिलमधील कामगार बांधवांच्या अडचणींची दखल घेऊन त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याची विनंती कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली असून, याबाबत सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न व पाठपुरावा होत असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या अखत्यारीतील फिन्लेसह चार मोठ्या गिरण्या बंद आहेत. एकट्या फिन्ले मिलमध्ये सुमारे 15 हजार कामगार कार्यरत आहेत. इतर गिरण्यांतही मोठ्या प्रमाणावर कामगार देखील कार्यरत आहेत. मात्र, या मिल बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची विनंती राज्यमंत्री श्री. कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. त्यानुसार मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी तत्काळ केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत मिल तातडीने सुरू करण्यासंबधी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली.

अचलपूरच्या फिन्ले मिलसह बार्शी येथील बार्शी मिल, मुंबईतील टाटा, इंदू मिल व पोद्दार मिल बंद असल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. केंद्र शासनाकडेही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे कामगार राज्यमंत्री श्री. गोयल यांनी सांगितले.