गुन्हेगारांनी पोलीस स्टेशन मध्ये केला पोलीस अमलदार टेबलाचा काच फोडून उद्रेक*

*गुन्हेगारांनी पोलीस स्टेशन मध्ये केला पोलीस अमलदार टेबलाचा काच फोडून उद्रेक*

गुन्हेगारांनी पोलीस स्टेशन मध्ये केला पोलीस अमलदार टेबलाचा काच फोडून उद्रेक*
गुन्हेगारांनी पोलीस स्टेशन मध्ये केला पोलीस अमलदार टेबलाचा काच फोडून उद्रेक*

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगनघाट.21/07/21शहरात वाढती गुन्हेगारी प्रवृती आता पोलीस स्टेशनच्या आतील अंमलदार टेबल पर्यंत पोहोचली आणि पोलिसांची दमछाक झाली शेवटी पोलीस स्टेशन डायरी वर कार्यरत असलेले सहायक फौजदार अनिल झब्बूलाल शर्मा वय 56 बक्कल क्रमांक 1050 यालाच गुन्हेगारा विरुद्ध तक्रार नोंदवून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे राहीले.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे तथा गुन्हेगारांवर वचक राहावी पोलीस प्रशासन गुन्हेगारा समोर कमजोर दिसून येत आहे। भ्रष्टाचार या एका किडणे संपूर्ण स्वैराचार व गुन्हेगार अधिक बलवान झाल्याचे बघायला मिळाले त्यासाठी हे उदाहरण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आरोपी नामे शंकर उर्फ दुर्गादास अशोक आडे वय 30 वर्ष रा. माता मंदिर वॉर्ड हिंगणघाट येथील आरोपी पोलीस स्टेशन मध्ये काही कारणास्तव आला असता स्टेशन डायरी वर असलेले अंमलदार यांच्याशी हुज्जत झाल्याने पोलीस अंमलदार शर्मा यांना अश्लील शिवीगाळ करीत आपला आवाज चढवीत अंगावर जात हातवारे करीत त्यांनी त्यांच्या स्टेबल वर असलेला काच फोडून आपल्या गुन्हेगारी व जोश भरलेल्या मर्दांगी प्रवृत्तीचा परिचय पोलिसांना साक्षात दाखवून दिला त्यामुळे शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे दिसून आले .वाढत्या अवैध दारूविक्री पासून तर चरस गांजा भांग तथा नशेच्या मनुका दार गोळ्या यांच्या विक्रीत वाढ होत असून युवा पिढी वय वर्षे 14 ते 20 पर्यंत युवक या व्यसनाच्या आधीन झाले असून ते आता पोलिसांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे कारण या नशेच्या व्यवसाय करणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्या महा भागाचा कोणत्या ना कोणत्या मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने व पोलिसचे हात ओले करत असलेल्याने पोलिस खादीचा धाक राहिला नाही त्यामुळे नवनिर्मान होणारी ही युवापिढी वीस वर्षाच्या वयोमानतच गारद होत असून व्यसनाच्या आहारी जाऊन मग घरून पैसे जर मिळाले नाही तर चोऱ्या करणे लूटमार करणे गुन्हेगारी प्रवृत्तीने भाईगिरी करणे त्यामुळे त्यांचे मनोबल वाढीस लागण्यास मदत होत असते त्यामुळे वाहने चोरी करणे शहरातून कर्कश आवाजात
भर रस्त्याने जोराने वाहन चालविणे लुटमारीचे प्रकार घडत आहे शहरातील महिलावर्ग सुद्धा सुरक्षित नसून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सर्व प्रकारावर संविधानात्मक रक्षण करणाऱ्या पोलीस विभाग
कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे पोलिसांचे दायित्व असते पोलिसांचे ब्रीद वाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” हे वाक्य कदाचित कुचकामी तर ठरणार नाही ना हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे भर दिवसा दुपारी 12:10 ला पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या घटनेमुळे पोलिसांचा वचक आता गुन्हेगारी, लुटमार , चोऱ्या चपट्या करणाऱ्यांवर राहाला नाही असेच आरोपी शंकर आडे याचा पोलीस स्टेशन मधील उद्रेका मुले हा प्रश्नन उभा ठाकतो
आरोपी विरुद्ध कलम 354 , 186 , 294 , 506 , 427 , भा.द.वि .सहकलम 3 सार्वजनिक संपतीस हानि प्रतिबंध अधिनियम 1984 सहकलम 110 , 112/117 महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये गुन्हाची नोंद करून तपास करीत आहे