ॲड.स्मृतिषेश मार्शल विमलसूर्य चिमनकर सर यांच्या स्मृतीला अभिवादन.

ॲड.स्मृतिषेश मार्शल विमलसूर्य चिमनकर सर यांच्या स्मृतीला अभिवादन.

ॲड.स्मृतिषेश मार्शल विमलसूर्य चिमनकर सर यांच्या स्मृतीला अभिवादन.
ॲड.स्मृतिषेश मार्शल विमलसूर्य चिमनकर सर यांच्या स्मृतीला अभिवादन.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
 वर्धा:-  जय भीम बुद्धविहार सिंदि (मेघे) येथे दि.03  ऑक्टोब सायं 6.30 वा ॲड.स्मृतिषेश मार्शल विमल सूर्य चिमनकर सर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्या संदर्भात वर्धा तालुका संघटक मार्शल मनोज थूल यांचे नियोजनातून कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम जेष्ट मार्गदर्शक मार्शल पुंडलिक गाडगे व जिल्हा समन्वयक नियोजन प्रमुख मार्शल गौतम देशभ्रतार यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यात आले. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर व मार्शल स्मृतिशेष मार्शल ॲड. विमलसूर्य चीमनकर सर यांना सैलुटेशन देण्यात आले.

सदर कार्यक्रमा प्रसंगी ॲड.मार्शल विमलसूर्य चीमनकर सर यांनी केलेल्या समता सैनिक दल नवीन आयामातून रचलेल्या कार्याबद्दल वर्धा तालुका संघटक मार्शल मनोज थूल तालुका यांनी माहिती दिली. त्यानंतर भंते कारूनिक यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी मार्शल पुंडलिक गाडगे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे संचालन जिल्हा बौद्धिक प्रमूख मार्शल नारायण मून सर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार नम्रता मनोज थूल यांनी मानले.

सदर कार्यक्रमाला जिल्हा सहसंघटक मार्शल अविनाश गायकवाड, जिल्हा प्रशिक्षक मार्शल मधुर येसनकर, मार्शल दिगंबर लांबे, मार्शल मारोतराव डंभारे, मार्शल रुपेश नगराळे, मार्शल शैलेश ओंकार, मार्शल गोपाळराव सोनटक्के, मार्शल कांबळे गुरुजी, मार्शल फुसाटे ताई, मार्शल रैशना थूल, मार्शल सानिया मनोज थूल, मार्शल सभ्यता मनोज थूल, मार्शल विहान व समता सैनिक दलाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच गावातील मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते.