दारूला पैसे दिले नाही म्हणून आईचे मुंडके छाटले.

55

दारूला पैसे दिले नाही म्हणून आईचे मुंडके छाटले.

हत्येनंतर तिचे मुंडके हातात घेऊन तो रस्त्यावर धावत सुटला

तेलंगणा:- दारूला पैसे देत नसल्याने एका व्यक्तीने त्याच्या 65 वर्षीय आईचे मुंडके छाटून तिची हत्या केली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर हत्येनंतर तिचे मुंडके हातात घेऊन तो रस्त्यावर धावत सुटला. या भयंकर घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तेलंगणातील नगरकुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे. संजय याला दारूचे व्यसन होते. तो नगरकुर्नूल जिल्ह्यातील वासंग गावात त्याच्या 65 वर्षीय आईसोबत राहायचा. संजयची आई मोलमजूरी करून घरखर्च चालवायची. तर जॉन हा कामधंदा न करत पूर्ण दिवस दारूच्या व्यसनात डुबलेला असायचा.

शुक्रवारी पहाटे संजय दारूच्या नशेत घरी आला व त्याने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. त्याच्या आईने पैसे नसल्याचे सांगितले. त्यावरून त्यांचा वाद झाला. संतापलेल्या संजयने रागाच्या भरात घरातील चाकूने आईवर सपासप वार केले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या आईचे मुंडके त्याने छाटले. त्यानंतर तो ते मुंडके घेऊन रस्त्याने पळत सुटला. याबाबत काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी संजयला अटक केली. संजयने काही अंतर पळाल्यानंतर त्याच्या आईचे मुंडके झुडपात फेकले.