Home latest News एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारला चाकू; आरोपी युवकाने घेतली वैनगंगा नदीत उडी.

एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारला चाकू; आरोपी युवकाने घेतली वैनगंगा नदीत उडी.

82

एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारला चाकू; आरोपी युवकाने घेतली वैनगंगा नदीत उडी.

प्रतिनिधी
गोंदिया:- जिल्हातील तिरोडा तालूक्यात एकतर्फी प्रेमातून युवकाने एका युवतीच्या पोटात चाकू खुपसल्याची संतापजनक घटना घडळी. यात तरुणी ही गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना चांदोरी खुर्द येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अतुल ओमप्रकाश शिवणे वय 26 वर्ष रा. कापसी खुर्द, जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे.
यातील पीडित युवती ही घरी स्वयंपाक करीत असताना अचानक आरोपी अतुल हा घराच्या मागच्या बाजूने आला आणि तुला जिवानिशी ठार मारेन, असे म्हणत तिच्या पोटावर सपासप चाकूने हल्ला केला. युवतीने विरोध केला असता त्याने पुन्हा तिच्या पोटावर, गळ्यावर वार केला. यावेळी तिला हल्ल्यातून वाचविण्यासाठी तिची आई धावून आली. मात्र, आरोपीने तिच्या आईलादेखील खाली पाडले. दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर शेजारचे धावून आले. त्यामुळे आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, गावकऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला असता, आरोपीने वैनगंगा नदीत उडी घेतली. गावकऱ्यांनी त्याला नदीतून बाहेर काढत चांगलेच चोपले. उल्लेखनीय म्हणजे, आरोपी युवकाने यापूर्वीदेखील पीडित युवतीला अनेकदा त्रास दिला. तसेच तिचे अपहरण केले होते. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकही करण्यात आली होती.
तथापि, या घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव, ठाणेदार उद्धव दमाळे, पोलिस उपनिरीक्षक लाला लोणकर, कर्मचारी अमरसिंग वसावे, राधा लाटे, मुकेश थेर, गिरीश पांडे ,सव्वालाखे यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी पोलिसांना विरोध करून आरोपीला आम्ही शिक्षा देऊ असा पवित्रा घेतला. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, म्हणून गोंदिया पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली होती. तेव्हा आरोपीला ताब्यात घेऊन उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पाठविण्यात आले. हल्ल्यातील जखमी युवतीला उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे भरती करण्यात आले आहे. सध्या चांदोरीत तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.