जरीपटका पोलीस कडून ३७६ कलम असलेल्या आरोपीवर कारवाईस दिरंगाई.

आरोपीच्या भावाकडून पीडितेला धमकी

प्रतिनिधी

नागपूर :- नागपूर जरीपटका पोलीस स्टेशन (शहर) अंतर्गत रहिवाशी असलेली पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसून तिच्या सोबत खोट्या पद्धतीने लग्न करून जबराईने शारीरीक संबध बनविले. व पीडितेला वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देऊन अन्याय केला आरोपी सौरभ संतोष तिवारी वय २७ वर्षे पद्मावती नगर गोधणी परिसर मधील रहिवाशी असून शहर पोलीस मध्ये कार्यरत असलेल्या पोलिसाचा मुलगा आहे.सदर प्रकरणात पीडितेने दि.०८/१०/२०२० पासून तक्रार नोंदविण्या करीता पीडिता पोलीस स्टेशन जरीपटका येथे जात असल्यास तिला पोलिसांनी तक्रार नोंद करण्यास टाळाटाळ केली नंतर दि.२३/१०/२०२० ला दुपारी १२ वाजेपासून रात्री १० पर्यंत बसून राहिल्या नंतर तक्रार नोंद करण्यात आली मुख्य म्हणजे पीडितेला माहिती न देता जरीपटका पोलीस विभागाने प्रकरण औरंगाबाद येथे पाठविले त्यामुळे पीडितेला मानसिक त्रास होत आहे.तसेच आरोपीचे वडील संतोष तिवारी पोलीस मध्ये असून पीडितेला धमकी देऊन त्रास देत आहे.तसेच आरोपीचा भाऊ सुरज तिवारी याने पीडितेला शिवीगाळ करून धमकी दिली की सौरभशी तुझे काहीही संबंध नाही असा करारनामा कर नाही तर तुझ्या नावाने पूणे येथे तक्रार करून तुरुंगात टाकू व तुला त्रास देऊ अशा आशयाची धमकी दिली आहे.आरोपीवर गुन्हा दाखिल होऊन सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई पोलीसाचा मुलगा असल्यामुळे केली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here