नाना पटोलेंचा पुतळा भाजपने जाळला..

56

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबाबत वारंवार आक्षेपार्ह भाषा वापरल्याबाबत नोंदवला निषेध

नाना पटोलेंचा पुतळा भाजपने जाळला..

क्रिष्णा वैद्य
२७ जानेवारी २०२२

ब्रम्हपुरी:- राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या बाबत खालच्या स्थराचे विधान केले होते. त्यानंतर आता पुन्हा नाना पटोले यांनी मोदीजीं बाबत बेताल विधान केले. या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरीच्या वतीने या क्षेत्राचे माजी आमदार, भाजप नेते प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.

या वेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरुद्ध निदर्शने करत त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदवला. मागील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी निवेदन दिले होते. या वेळी मागणी पूर्ण न झाल्यास आक्रमक पवित्रा घेऊ असा इशारा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. आज नाना पटोले यांचा पुतळा जाळून युवा मोर्चाच्या वतीने त्यांचा निषेध नोंदवला.

या प्रसंगी भाजपचे माजी नगर अध्यक्ष फकिराजी कुर्वे, नगर महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज भूपाल, शहर उपाध्यक्ष विनायक दुपारे, साकेत भानारकर, पं. स सदस्य प्रकाश नन्नावरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवें, सोशल मीडिया तालूका प्रमुख अविनाश मस्के, सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष अमित रोकडे, रजत थोटे, ललित उरकुडे, बंटी येरावार, विलास संगोडकर, राजेंद्र चौधरी यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.