Home latest News सुपर मार्केटमध्ये वाइनविक्रीला रामदास आठवलेंचा विरोध; म्हणाले…

सुपर मार्केटमध्ये वाइनविक्रीला रामदास आठवलेंचा विरोध; म्हणाले…

102

किराणामाल आणि सुपर मार्केट दुकानात वाइन विक्री करण्याचा राज्य शासनाने निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष आंदोलन करणार, असा इशारा

सुपर मार्केटमध्ये वाइनविक्रीला रामदास आठवलेंचा विरोध

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोबा. नं. :- 9768545422

मुंबई: किराणा दुकान आणि ‘सुपर मार्केट’मध्ये वाईन विक्री करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे. हा निर्णय समाज विघातक आहे, अशी टीका सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

आठवले पुढे म्हणाले, ‘किराणा मालाचे दुकान आणि सुपर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गृहिणी महिला विद्यार्थी लहान मुले जात असतात. गृहपयोगी वस्तू घेत असतात. अशा दुकानांमध्ये जर मद्य विक्री सुरू झाली तर तो राज्य सरकार चा निर्णय समाजासाठी घातक निर्णय ठरेल. त्यामुळे व्यापारी वर्गाने त्यांच्या किराणा दुकानात मद्य विक्री करू नये’, असे आवाहन देखील यावेळी रामदास आठवले यांनी केले.

‘ज्या किराणामाल आणि सुपर मार्केटमध्ये मद्यविक्री होत असेल अशा दुकानातून जनतेने कोणत्याही वस्तू खरेदी करू नये. मध्य विक्री करणाऱ्या किराणामाल दुकान आणि सुपर मार्केटवर जनतेने बहिष्कार टाकावा’, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

किराणामाल आणि सुपर मार्केट दुकानात वाइन विक्री करण्याचा राज्य शासनाने निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष आंदोलन करणार, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.