मनोहर मेश्राम जिल्हा कलावंत निवड समितीवर
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी /पवनी:-कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बंदीमुळे एकल कलाकारांवर आर्थिक संकट कोसळल्याने अर्थसहाय्य देण्या हेतू कलावंत निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ. संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून यात सदस्य म्हणून पवनी येथील पत्रकार मनोहर बाजीराव मेश्राम यांची निवड लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मनोहर मेश्राम हे मूळचे पवनी तालुक्यातील धामणी/चौ. येथील असून नाट्यकलावंत, नाट्यलेखक, पत्रकार, संपादक असा प्रवास असून सामाजिक कार्यात विशेष रुची असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांना दिले आहे. त्यांच्या निवडीचे अभिनंदन कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विकास राऊत, तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे, माजी पं. स. सदस्य हंसराज गजभिये, धर्मेंद्र नंदरधने, प्रकाश पचारे, मनोहर उरकुडकर, चंद्रशेखर कावळे, राजेंद्र भुरे, शैलेश मयूर, हरीश तलमले, राजेंद्र फुलबांधे, विपीन बोरकर, हरिश्चंद्र भाजीपाले, महेश नान्हे, अनिकेत गभने, अमित पारधी, चेतन हेडाऊ, तुषार भोगे, ब्रह्मदास बागडे, अशोक पारधी, महादेव शिवरकर, प्रशांत पिसे, अरविंद धारगावे इत्यादींनी केले आहे.