Home latest News गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे 93 व्या वर्षी निधन, अवघ्या देशावर शोककळा.

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे 93 व्या वर्षी निधन, अवघ्या देशावर शोककळा.

97

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे 93 व्या वर्षी निधन, अवघ्या देशावर शोककळा.

● संगीत मधिल एका ध्रुवतारा हरपला. ●
● देशात 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर ●
● देशातील अनेक लोकांनी वाहली श्रद्धांजली. ●
● मिडिया वार्ता न्युज तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली ●

✒प्रशांत जगताप कार्यकारी संपादक✒
📱9766445348
मुंबई:- “मेरी आवाज ही मेरी पहेचान है” ज्याची आवाज या देशाची शान असलेल्या. गेल्या अनेक दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘सुवर्ण सुरांनी’ आज विराम घेतला. भारतरत्न,  गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज सकाळी प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यामूळे संपुर्ण देशात दुःखद लहर आली आहे.

आज वयाच्या 93 व्या वर्षी लता मंगेशकर यानी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये माघिल अनेक दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होता. कोरोना बाधित झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या रुग्णालयात होत्या. लता मंगेशकर या उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र काल अचानक तब्येत बिघडली. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.

रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. कोव्हिडची लागण झाल्यापासून 28 दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. लतादीदींच्या निधनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

प्रभुकुंजवर अंत्यदर्शन, शिवतीर्थावर अंत्यसंस्कार

मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. लता मंगेशकर यांच्या पश्चात तीन भगिनी – प्रख्यात गायिका आशा भोसले, संगीतकार मीना खडीकर,  गायिका उषा मंगेशकर, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक- संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत.