नागपुर: कोंढाळीजवळ कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, एक महिला दोन पुरुष जागीच ठार.

59

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📱9923296442
नागपूर :- नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी गावाजवळ एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. काही लोक अमरावतीवरून नागपूरकडे येत होते. अचानक  कारचा टायर फुटला. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यामूळे सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोंढाळी गावाजवळ टायर फुटल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरवर आदळली. कारमधील एक महिला दोन पुरुष जागीच ठार झाले. कोंढाळीवरून राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळं या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते. चालकाची कार वेगाने होती. अशात टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण राहिले नाही. ही कार सरळ बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आदळली. कार इतक्या जोराने आदळली की, कार पूर्णपणे चक्काचूर झाली. कारच्या काचा फुटल्या. ही कार चेपकली. कारमध्ये बसलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतकांच्या शरीराच्याही चिंधड्या उडाल्या. घटनेनंतर गर्दी जमा झाली. कारमधील मृतकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहचले. मृत कोण आहेत, याचा तपास सुरू आहे. मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.