पुणे: पुण्यातील मुंढवा परिसरात एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या २२ वर्षीय संगणक अभियंता तरुणीनं इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. अश्विनी गवारे असं या तरुणीचं नाव आहे.

अश्विनी मूळची विठ्ठलवाडी (शिरूर) येथील रहिवासी असून, सध्या चंदननगर (खराडी) येथे राहत होती. ती चार महिन्यांपासून मुंढव्यातील एका खासगी कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. चार दिवसांनंतर ती आज सकाळी कामावर रुजू झाली. कार्यालयात आल्यानंतर इमारतीच्या सातव्या मजल्यावरून तिनं उडी मारली. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची नोंद मुंढवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here