Home latest News मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप.

मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप.

80

मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप.

चंद्रपूरजिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर : बल्लारपूर ‘देव तारी, त्याला कोण मारी’ अशी एक म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच एक घटना बल्लारपुरातील गणपती वॉर्डात घडली. छातीत दुखू लागल्याने एका महिलेस चंद्रपुरातील एका खासगी डॉक्‍टरकडे दाखल केले. उपचाराअंती डॉक्‍टराने त्या महिलेस मृत घोषित केले. अंत्यसंस्कारची तयारी सुरू झाली. तेव्हा महिलेच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या.

हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आला. तातडीने महिलेस नागपुरात हलविण्यात आले. त्या महिलेची प्रकृती आता उत्तम असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

 

शहरातील गणपती वॉर्डात भारती मराठे राहतात. नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अशी त्यांची ओळख आहे. शनिवारी (ता. ७) दुपारच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे तपासणीसाठी चंद्रपूर शहरातील एका खासगी डॉक्‍टरांकडे त्यांना आणण्यात आले. डॉक्‍टरांनी उपचाराअंती भारती मराठे यांना मृत घोषित केले. डॉक्‍टरांच्या सांगण्यावरून भारतीचा मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबीयांनी आप्तस्वकीयांना बोलावून घेतले.

घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र, रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक या महिलेचे हात पाय हलल्याचे काही उपस्थितांच्या निदर्शनास आले. त्यामुळे महिलेस पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. आता भारती मराठे यांची प्रकृती उत्तम असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मात्र, घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहेत.