Home latest News जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेला परवानगी द्या…ठाकचंद मुंगुसमारे

जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेला परवानगी द्या…ठाकचंद मुंगुसमारे

73

जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेला परवानगी द्या…ठाकचंद मुंगुसमारे

जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेला परवानगी द्या...ठाकचंद मुंगुसमारे

मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/तुमसर : महाशिवरात्री यात्रेची जिल्ह्यात शेकडो वर्षांची ही परंपरा गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे खंडित झाली आहे. आता जिल्हा व राज्य कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना व इतर राज्यात यात्रेस परवानगी असताना, जिल्हा प्रशासनाने मात्र यात्रेस बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाने तो आदेश रद्द करून नव्याने धार्मिक प्रथा व परंपरेने महाशिवरात्री यात्रेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी तुमसरचे रायुका तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र म्हणतात. माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. लाखो
भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करीत, अख्खी रात्र जागून काढत दुसऱ्या दिवशी उपवास संपवितात. त्या ठिकाणी पोहे काढले जाऊन अनेक भक्त नवस फेडतात. मात्र, कोरोनामुळे भाविकांच्या भक्तीला ब्रेक लागला व भक्तांनी ही प्रशासनाला साथ दिली होती. मात्र, आता ती परिस्थिती जिल्ह्यात आणि राज्यात नसताना व इतरत्र राज्यातील पंचमढी यात्रेस शासनाने परवानगी दिली असताना, जिल्ह्यांवरच हा अन्याय का, असा प्रश्न भक्तांना पडला असून, प्रशासनाने याबाबत विचार करावा अशी मागणी ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे.