खेड्यात राहणाऱ्या मुलांनी काय केले हो गुन्हा..? जुळत नाहीत लग्न काय केले हो गुन्हा ..? ” एक विदारक सत्य कविता “

खेड्यात राहणाऱ्या मुलांनी काय केले हो गुन्हा..? जुळत नाहीत लग्न काय केले हो गुन्हा ..?

” एक विदारक सत्य कविता “

खेड्यात राहणाऱ्या मुलांनी काय केले हो गुन्हा..? जुळत नाहीत लग्न काय केले हो गुन्हा ..? " एक विदारक सत्य कविता "

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

मोहाडी :- खेड्यात राहतो म्हणुन आम्ही, काय केला असा गुन्हा,
जुळेना लग्न आम्हा मुलांचे,
भेटेल का आई बापाला पहावयास सूना…..?
वावर घर सार हाय,
पोटा पूर्ती भाकर हाय,
कष्ट करायची तयारी असोनी,
मुलगी मात्र भेटत नाय….?
पोरं आमची छत्तिशित हाय,
मुली पहूनिया थकलेले पाय,
सूने साठी झुरते माय,
बाप बिचारा करील काय…..?
होईल का हो लग्न आमचे,
सुटतील का हो प्रश्न जुना,
समाज नदीच्या प्रवाहामध्ये,
पोहता येईल का आम्हाला पुन्हा?
ग्रामीण मुलांच्या भल्यासाठी,
संघटित व्हा व्ह्या समाज विभूती,
करुनी तडजोड शेतकरी पुत्रासाठी,
जुळवूनी आनुया रेशीमगाठी..?
द्याल का हो सात मला या कामासाठी……..?.