हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेकडो युवक व महिलांचा जंगी प्रवेश.
अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट : – हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामाजिक कार्यकर्ता *प्रशांत मेश्राम सह शेकडो युवक व महिला कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव अभिजीतजी फाळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व वर्धा जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला.* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांवर प्रेरित होऊन हा पक्ष प्रवेश सोहळा के.जी.एन हॉल हिंगणघाट येथे पार पडला.
त्यावेळी प्रदेश सचिव सामाजिक व न्याय विभाग राजुभाऊ वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक व न्याय प्रदीपभाऊ वानखेडे, प्रलय तेलंग, भूषण पिसे,युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काटकर, स्नेहल मानकर, भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे जिल्हा अध्यक्ष योगेशभाऊ घोगरे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष प्रवीण जनबंधू,नावेद शेख उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मेश्राम तसेच युवक-महिला कार्यकर्त्यांचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या वतीने *सर्वांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*