लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाची तपासणी

लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाची तपासणी

लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाची तपासणी

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391

नांदेड : -नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाची वार्षिक तपासणी नुकतीच पार पडली. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक तांबोळी यांनी दि. ७ ते ११ मार्च व नंतर दि. २३ व २४ मार्च या दरम्यान लातूर जिल्ह्याचे वार्षिक तपासणी केली.
या तपासणीच्या दरम्यान त्यांनी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, शाखाचे निरीक्षण केले. त्यादरम्यान पोलीस मुख्यालय, लातूर येथे पोलीस परेडचे व विविध प्रत्याशिकाचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्ह्याच्या २०२१ वर्षाच्या कामगिरीचे २०२० वर्षाच्या कामगिरीशीही संख्यात्मक तुलना व अवलोकनही त्यानिमित्ताने करण्यात आले. त्या आधारे एकंदरीत कामगिरीविषयी तांबोळी यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना तांबोळी यांनी एकंदरीत कारवाया अशाच पद्धतीने चालू ठेवाव्यात, याही पेक्षा अजून चांगल्या
प्रकारे, जोशाने काम कसे करता येईल या विषयीे पोलीस उपमहानिरीक्षक तांबोळी यांनी संबंधितांना सूचना केल्या आहेत.