अर्पणा लाटकर(पातकमवार) यांना प्रशासनाचा आशीर्वाद

अर्पणा लाटकर(पातकमवार) यांना प्रशासनाचा आशीर्वाद….

अर्पणा लाटकर(पातकमवार) यांना प्रशासनाचा आशीर्वाद

✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली : – प्रतिनिधी
पंचायत समिती गडचिरोली येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर कार्यरत असलेली. अपर्णा लाटकर (पातकमवार) यांनी अल्पदृश्टी असल्याचे अपंगाचे बनावट प्रमाणपत्र प्रशासनाला सादर करून शासनाची, व प्रशासनाची दिशाभूल करून ही प्रशासन अधिकारी या पदापर्यंत येवून पोहचलेली आहे. ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनात येत असताना सुद्धा. प्रशासनाने अर्पना लाटकर (पातकमवार) यांच्यावर आतापर्यंत कुठलीच कारवाई न करता उलट अर्पणा लाटकर ( पातकमवार) या महिलेस अभय देण्याचा प्रयत्न करीत आहे. अपर्णा लाटकर ( पातकमवार) यांना अभय देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी. गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विनोद कोडापे, यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली असून गडचिरोली जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सुद्धा दिलेले आहे.निवेदन देवून आज अंदाजे 20 ते 25 दिवसांचा कालावधी लोटला जात असताना सुद्धा प्रशासनाने अपर्णा लाटकर (पातकमवार) यांच्यावर आतापर्यंत कुठलीच कारवाई न करता उलट अभय देताना दिसत आहेत.
अर्पना पातकमवर यांची पाठराखण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद कोडापे यांनी केली आहे.