Home latest News समता सैनिक दल वर्धा युनिटचा उपक्रम.

समता सैनिक दल वर्धा युनिटचा उपक्रम.

105

समता सैनिक दल वर्धा युनिटचा उपक्रम

वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा:- समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिट द्वारे गाव तिथे शाखा,घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय या अभियानांतर्गत आज समता सैनिक दलाची शाखा स्थापन करण्यासंदर्भात दाणापूर ता.कारंजा,जि. वर्धा येथील विहारात बैठक संपन्न झाली. या बैठकीत समता सैनिक दलाचा उपक्रम व शाखा बांधणीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीला जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे, जेष्ठ मार्गदर्शक मार्शल रमेश निमसडकर,मार्शल गौतम देशभ्रतार, मार्शल स्वप्निल कांबळे, मार्शल प्रदिप कांबळे, मार्शल मधुर येसनकर,मार्शल मनोज थुल,मार्शल अविनाश गायकवाड, मार्शल प्रदिप मेंढे सर आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.