महाड शहर शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्यांचा जाहीर निषेध
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
दि.७ एप्रिल २०२२ रोजी ठिक ११:०० वाजता महाडमध्ये शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून महाड शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्याविरोधातील कारवाई विरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी महाड शहर व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तालुका प्रमुख सुरेश महाडीक, महाड सहसंपर्कप्रमुख श्री.विजय सावंत, महाड शहरप्रमुख नितीन पावले, डाॅ.चेतन सुर्वे, कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष बशिर चिचकर, महाड शहर युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर, महाड नगरसेवक सुनील अग्रवाल, बंधू तर्डे, व कार्यकर्ते उपस्थित होते.