राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संवाद यात्रेचे 13 एप्रिल २०२२ रोजी महाड येथे आयोजन-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संवाद यात्रेचे 13 एप्रिल २०२२ रोजी महाड येथे आयोजन-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संवाद यात्रेचे 13 एप्रिल २०२२ रोजी महाड येथे आयोजन-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर संवाद यात्रा चालू असून दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी दुपारी तीन वाजता बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पालक मंत्री कु. आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांची उपस्थिती लाभणार आहे? महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.११ एप्रिल 2022 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकास कामांना प्राधान्य देणारा पक्ष असून शेवटच्या घटकापर्यंत विकास व्हावा शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचाव्या यादृष्टीने संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच महाड येथे 22 व 23 जुलै 2021 मध्ये महाड येथे पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रथम खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पुरेपूर मदत महाड साठी करण्यात आली त्या अनुषंगाने महाड तालुका व शहर येथील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असून योग्य वेळी प्रवेश घेतला जाईल अशा प्रकारचा सूचक इशारा दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य संतोष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवक सचिव रिहान देशमुख, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम, चंद्रकांत बुवा जाधव, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाड शहर अध्यक्ष राकेश शहा, तसेच महाड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.