संविधान दिना निमित्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

संविधान दिना निमित्य घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आकाश झाडे प्रथम, पूजा अग्निहोत्री द्वितीय तर विद्या नरड तृतीय पारितोषिकाचे मानकरी !

प्रा.अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- महाराष्ट्र दिन आयोजन समिती द्वारा संविधान दिना निमित्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पुणे, औरंगाबाद तसेच विदर्भातील अनेक वक्त्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. युवकांचा राजकारणात सहभाग ही काळाची गरज! व संविधानिक भारत अराजकते कडे वाटचाल करत आहे का? या विषयावर वक्त्यांनी आपले मत मांडले. या स्पर्धेत हिंगणघाट येथील आकाश झाडे प्रथम, गिरड येथील कु. पूजा अग्निहोत्री द्वितीय तर अल्लीपूर येथील कु. विद्या नरड तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.

स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र दिन आयोजन समिती चे अध्यक्ष सनी बासनवार, अक्षय थुटे, विशाल पराते, अभिजित नरवडे, संकेत नांदुरकर, शैलेश मैंद, दादू चाफले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here