Home latest News अबबबब सूर्य आग ओकतोय! उन्हाच्या तडाख्या पासून सावधान मनपातर्फे उन्हापासून बचावासाठी...

अबबबब सूर्य आग ओकतोय! उन्हाच्या तडाख्या पासून सावधान मनपातर्फे उन्हापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन

73

अबबबब सूर्य आग ओकतोय! उन्हाच्या तडाख्या पासून सावधान

मनपातर्फे उन्हापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन

अबबबब सूर्य आग ओकतोय! उन्हाच्या तडाख्या पासून सावधान मनपातर्फे उन्हापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपूर शहर हॉटस्पॉट ठरला असून, सूर्य आग ओकतोय, एप्रिल महिन्यामध्येच तापमानाने ४५ टक्केच्या वर उच्चांक गाठला आहे. तापमान अधिक वाढनार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे की, अशावेळी नागरिकांनी आपल्या काळजीसाठी उन्हाच्या झळापासून सावध राहण्याची गरज आहे. नागरिकांनी शक्यतो १२ ते ४ च्या दरम्यान बाहेर जाण्याचे टाळावे. अतिआवश्यक कामासाठी बाहेर निघताना डोक्यावर गोल टोपी, सुत्ती दुप्पटा, पटका, रुमाल, किवा छत्री वापरावी. तसेच घराच्या खिडक्या, दरवाजातून सूर्यप्रकाश थेट येण्यास प्रतिबंध करा व शरीरातील पाण्याची आवश्यक मात्रा कायम राखण्यासाठी भरपूर जलपान करा व ताक, लस्सी, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ तसेच कलिंगड, खरबूज आदी मोसमी फळाचे सेवन करा.

तसेच भर उन्हात शारीरिक कष्टाची कामे करणे शक्यतो टाळा. चप्पल न घालता उन्हात चालू नका. भर उन्हात दुचाकी अथवा चारचाकिने प्रवास करीत असल्यास वाहनाची गती कमी ठेवा. मद्य चहा, कॉफी, आणि साखरेचे अतिप्रमाण असलेल्या कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे. असे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.