भगवान बुद्धाची शिकवण अंगिकारा…..डॉ मंगेश गुलवाडे.
बौद्ध भिक्खुंना चिवर वस्त्र दान
बुद्ध पौर्णिमेला महानगर भाजपाचा उपक्रम
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016
चंद्रपूर : – भगवान बुद्धाची शिकवण समस्त मानवजातीला अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी आहे.क्रोधाला प्रेमाने,पापाला सदाचाराने,लोभाला दानाने तर असत्याला सत्याने जिंकता येते अशी शिकवण तथागताने दिली.ही शिकवण समस्त मानवजातीला तारणारी आहे.म्हणून भगवान बुद्धाची शिकवण अंगिकारा असे प्रतिपादन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले. ते सोमवार16 मे 2022 ला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने धम्मभुमी महाविहार आंबेडकर नगर बाबुपेठ चंद्रपुर येथे महानगर भाजपा तर्फे आयोजित बुद्ध पौर्णिमा निमित्य ‘भिक्खुंना चिवर वस्त्रदान’कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी भदंत सुमनवन्नो महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत भदंत सुमनवन्नो महास्थविर,भदंत संघवंश,भदंत धम्मप्रकाश संबोधि ,भदंत रत्नमनी ,श्रमन पदमवन्नो या भिक्खुंना चिवर वस्त्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महामंत्री ब्रिजभुषण पाझारे,सुभाष कासनगोट्टुवार, महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा राजेश थूल,माजी नगरसेवक प्रदीप किरमे,सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार,मोरेश्वर खैरे,संतोष रामटेके,अनिकेत रामटेके,सुयोग ढोके,समीर ढोके,पिपरे साहेब,शिवा रायपुरे यांची उपस्थिती होती.