Home latest News समता सैनिक दलाच्या वतीने बाईक रँलीचे आयोजन

समता सैनिक दलाच्या वतीने बाईक रँलीचे आयोजन

94

समता सैनिक दलाच्या वतीने बाईक रँलीचे आयोजन

समता सैनिक दलाच्या वतीने बाईक रँलीचे आयोजन

अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

वर्धा: सम्यक सम्बुद्ध महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटच्या वतीने शांती बाईक रँलीचे आयोजन करण्यात आले होते. या रँलीची सुरवात जय भिम बुद्ध विहार सिंदी (मेघे) येथून करण्यात आली.यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मानवंदना देण्यात आली.तथागत गौतम बुद्धाच्या प्रज्ञा,शिल,करुणा,शांती,मैत्री,समता,
बंधुतेचा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी या शांती बाईक रँलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रँलीचे नेतृत्व समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे व अमरावती जिल्हा ट्रेनिंग आँफिसर सुशील मेश्राम यांनी केले .वर्धा जिल्ह्यातील सर्व विहारांना भेटी देत रँलीची सांगता सिव्हिल लाईन वर्धा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ करण्यात आली.
यावेळी रँलीत वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, तालुका संघटक मनोज थुल, ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलिक गाडगे,सामाजिक कार्यकर्ते दिगांबर लांबे, मार्शल आर्ट असोशिएशनचे महेश गावंडे, मार्शल अमोल ताकसांडे,मार्शल चंदु भगत,मार्शल सानिया थुल, मार्शल सभ्यता थुल,मार्शल विक्रात पंकज थुल आदींचा सहभाग होता.