जाणून घ्या काय आहेत अग्नीवीर योजनेची वैशिष्टये

जाणून घ्या काय आहेत अग्नीवीर योजनेची वैशिष्टये

जाणून घ्या काय आहेत अग्नीवीर योजनेची वैशिष्टये
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,

अग्निवीर योजनेच्या नावाने खडे फोडण्यापूर्वी समस्त तरुणांनी हा लेख वाचावा…

१) एम पी एस सी, यु पी एस सी च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि पदरी निराशा येते.

त्या ऐवजी… १० + २ + ३ वर्षाची कोणतीही पदवी घ्या…

अग्नीवीर व्हा. चार वर्षात शरीर, मन कणखर करा…

उत्तम पर्फोर्म केले पूर्ण वेळ सैन्यात जाल…

सामान्य पर्फोर्म केले तरी हरकत नाही बाहेर पडताना खिशात १२ ते १५ लाख असतील.. वय असेल २५ .

रसरशीत तारुण्य , दणकट शरीर , कणखर मन… आणि खिशात पैसे….

कोणताही व्यवसाय सुरु करा, शेती मध्ये पैसे घाला आणि राबा … कुणाच्याही पाया पडायची गरज नाही.. आई बापांना मालमत्ता गहाण ठेवायची गरज नाही स्व कमाईवर धंदा सुरु कराल…

२ ) तीस वर्षाचे होईतो छान सेटल झालेले असाल.. तुमचे MPSC वाले मित्र अजूनही तिथेच रेंगाळत असतील…

३) शारीरिक सक्षमता तुम्हाला बाहेर पडल्यावर पोलीस भरती, security अश्या किती तरी ठिकाणी नोकरीला पात्र करेल..

४ ) देशासाठी लढताना कामी आलात तर जन्म सफल होईल…

मेडिकल आणि इंजिनियरिंग च्या मायाजालात न फसता आपली सामान्य बुद्धिमत्ता आहे हे लक्षात घेऊन ही एक अत्यंत उत्तम संधी आहे हे जाणा.