रेखा जरे हत्या प्रकरण- पत्रकार बाळ बोठे मुख्य आरोपी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे या हत्येमागचे सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी 30 नोव्हेंबर रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अखेर राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना; तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली. पोलीस या आरोपींकडे कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, गाडीला कट मारल्याचा कारणावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र जरे यांची हत्या ही सुपारी देऊनच केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

बोठे यांनीच सुपारी देऊन आणखी एका आरोपीच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बोठे सध्या फरार असून अटकेसाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असून काही वस्तू जप्त करण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं.रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता, सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार यांची नावं समोर आली.

मुख्य सूत्रधार आरोपीं पत्रकार बाळ ज. बोठे

या दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली.

या पाच जणांकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तसे पुरावेही मिळाल्याचे पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बोठे यांना अटक करण्यासाठी पथकं रवाना केली आहेत.रेखा जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली आहे हे मुख्य सूत्रधाराला पकडल्यानंतरच स्पष्ट होईल, असंही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

पोलिसांनी आरोपींकडून सुपारी म्हणून देण्यात आलेले 6 लाख 20 हजार रुपये जप्त केले आहेत. ही सुपारीची रक्कम बोठे आणि भिंगारदिवे यांनी मिळून दिली होती, असंही पाटील यांनी सांगितलं. 3 डिसेंबर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या सर्व आरोपींची नावं समाविष्ट करण्यात आली असून खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.

24 नोव्हेंबरला झाला होता प्रयत्न

रेखा जरे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला तेव्हा त्यासाठी 24 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र 24 नोव्हेंबरला आरोपींचा डाव फसला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याला दुजोरा दिला असून, प्राथमिक तपासात ही माहिती उघड झाली आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्यावर 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातल्या जातेगाव घाटात हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेतल्या जरे यांना रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

रेखा जरे स्वतः कार चालवत नगरकडे येत असताना रस्त्यात एका दुचाकीला कट लागल्यावरून वाद झाला. वाद सुरु असतानाच दुचाकीस्वाराने जरे यांच्यावर धारदार शस्नाने वार केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here