Home latest News मनोरा तालुका हत्या प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी

मनोरा तालुका हत्या प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी

89

मनोरा तालुका हत्या प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी!

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान 

मो: 7350050548

मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कारली येथील संजय दता बावणे याचा लोखंडी विळा मारून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर आरोपी राजू पांडे फरार होता. त्याला पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयासमक्ष हजर केले असता, पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

कारली येथे पुर्ववैमनस्यातून सायंकाळी संजय बावणे यांची छातीत लोखंडी विळा मारून हत्या केली होती. तेव्हापासून आरोपी फरार होता. दरम्यान, पोलिसांनी चार पथक तयार करून आरोपीचा कसून शोध घेतला. सायंकाळी भूक लागल्याने जेवणासाठी तो घरी आल्याची गुप्त माहिती ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांना मिळताचक्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने पांडेला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.