एक हात मदतीचा उपक्रम:पूरग्रस्तांसाठी लोकनेते आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी जपली”माणुसकी”

एक हात मदतीचा उपक्रम:पूरग्रस्तांसाठी लोकनेते आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी जपली”माणुसकी”

एक हात मदतीचा उपक्रम:पूरग्रस्तांसाठी लोकनेते आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी जपली"माणुसकी"

स्वप्निल श्रीरामवार
तालुका प्रतिनिधि
मो न 8806516351

*राज्याचा शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात व सिरोंचा तालुक्यात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा दौरा-पूरग्रस्तांना मदतीचा हात

*माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांनी पोचवल्या दुर्गम भागातील आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू वाटप सोबत
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच मतदारसंघाचे युवानेते श्री.ऋतुराज हलगेकर यांचेही हस्ते

*अहेरी विधानसभा क्षेत्र*:-विदर्भातील काही भागात पावसाने थैमान घातल्याने नगरम●चिंतलपल्ली●पेंटींपाका●आयपेटा●दुब्बपल्ली●नडीकुडा●कोत्तापल्ली●अंकिसा●आसरअल्ली●लक्ष्मीदेवपेट●सुंकरेल्ली●सोमनूर●सोमनपल्ली●मुर्दूकृष्णपूर●सुरायपल्ली●मेडारम●कारसपल्ली●बामणी●वेंकटापूर●टेकडा●आदी भागात प्रचंड पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.अनेकांच्या संसार उध्वस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत अशा अपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिडावी यासाठी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे जननेते आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेबांच्या यांच्या पुढाकाराने ‘एक हात मदतीचा’हा उपक्रम हाती घेतला आहे. पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आले.
दुर्दैवी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला होता.जास्तीच्या पावसाने धरणांतील पाणी सोडण्यात आले होते.ती पाणी मेडिगड्डा जलप्रकल्पा साठा झाल्याने ती पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खालील भागात असलेलं काही भाग म्हणजे (कोत्तापल्ली.नडीकुडा. अंकीसा.आसरअल्ली.)आदी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.स्वतःचे जीव वाचविण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत होता.आजही परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्यामुळे शासकीय यंत्रणा अपुरी ठरत आहे.पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रशासनाकडून काम सुरू आहे जे पुरातून सुरक्षितपणे बाहेर आले आहेत.त्यांना जीवनावश्यक वस्तूंची गरज भासत आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांच्याकडून पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आले.
*अहेरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे सर्व सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता याबाबतचे पंचनामे तत्काळ करून शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे केला गेला आहे.*
यावेळी उपस्थित सिरोंचा तहसीलचे तहसीलदार व पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच,ग्रा.प.सदस्य नगरसेवक,व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते.