नाबार्ड २७ अंतर्गत वरोरा – भद्रावती येथील कामांना निधी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश

नाबार्ड २७ अंतर्गत वरोरा – भद्रावती येथील कामांना निधी

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश

नाबार्ड २७ अंतर्गत वरोरा - भद्रावती येथील कामांना निधी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाला यश

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016

चंद्रपूर : भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. या भागातील पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी शासन स्थरावर पाठपुरावा करून निधी आणण्यात खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी आग्रही असतात. आज देखील पुरवणी मागण्याच्या माध्यमातून नाबार्ड २७ अंतर्गत वरोरा – भद्रावती येथील कामांना निधी आणण्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना यश आले आहे.

भद्रावती तालुक्यातील माजरी, ढोरवासा, मुरसा प्रजीम १० सा क्र. १६/२०० पुलाच्या बांधकामाकरिता सन २२-२३ मध्ये ३३ लक्ष ३८ हजार रुपये तर वरोरा तालुक्यातील नागरी, खांबाडा, साखरा, पारडी , खामनगाव प्रजीम ३ कि. मी ३९/७५० वरील पुलाचे बांधकाम करण्याकरिता ७७ लक्ष ७३ हजार निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील अर्थसंकल्पात देखील या कामांना निधी आणण्यात यश आले होते.

खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नामुळे या भागाच्या मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. सामान्य माणसाच्या आवाज सभागृहात मांडण्याचे काम धानोरकर दाम्पत्य करीत आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकास साधण्याकरीता विविध विकास कामांचा पाठपुरावा करून निधी खेचून आणण्याचे काम ते करीत आहे. आज देखील पुरवणी मागण्याच्या माध्यमातून दोन कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढे देखील अशाच प्रकारे विकास कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.